👁 6 Views

बहिणीची छेड काढल्यावरून युवकाचा खून, निलगिरी बाग परिसरात खळबळ

 

नाशिक : वारंवार बहिणीची छेड काढत असल्याच्या कारणावरून औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेत राहणाऱ्या २७ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी (दि.२२) रात्री साडे दहा वाजता घडली आहे.


निलगिरी बाग येथे असलेल्या मोकळ्या पटांगणात घडलेल्या या घटनेत परिसरातच राहणाऱ्या विकास रमेश नलावडे (२७) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी निलगिरी बाग येथे राहणाऱ्या अमोल साळवे या संशयिताला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलगिरी बाग येथिल घरकुल योजनेत राहणारा मयत विकास नलावडे हा गेल्या काही दिवसांपासून संशयित आरोपी असलेल्या साळवे याच्या बहिणीची छेड काढत होता.

 त्यातून नलावडे व साळवे या दोघात यापूर्वीही वाद झाले होते.मात्र बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास मयत नलावडे याने संशयित साळवे याला निलगिरी बाग बिल्डिंग नंबर ५ जवळ मोकळ्या पटांगणात बोलावून घेतले आणि तुझ्या बहिणीची लग्न करायचे आहे असे सांगितले. त्यातून दोघात वाद झाले. त्यानंतर बहिणीची छेड काढत असल्याने पुर्वीपासून मनात राग असलेल्या साळवे याने धारदार चॉपरने नलावडे याच्यावर वार केले.


 या घटनेत नलावडे गंभीर जखमी झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तत्काळ उपचारासाठी आडगाव येथील डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, परंतु ,उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. 

या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी साळवे याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या घटनेतील मयत नलावडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे आडगाव पोलिसांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *