पंढरीत राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन

पंढरपूर (प्रतिनिधी):-  आज दि. 17 जुन 2016 रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त अ.भा. छावा मराठा युवा संघटन च्या वतीने येथील जिजामाता उद्यानातील राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन राष्ट्रमातेस अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिजाऊंच्या पुतळा परिसरात सर्वत्र पणत्या लावण्यात आल्या होत्या. यावेळी अ.भा. छावा मराठा युवा संघटन चे शहराध्यक्ष सागर कदम, छावा विद्यार्थी आघाडी प.महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय काळे, शहर संघटक सागर चव्हाण, शहर सचिव गणेश थिटे, शहर संपर्क प्रमुख शेखर भोसले, राष्ट्रवादी युवक शहर कार्याध्यक्ष भास्कर जगताप, सोपानकाका देशमुख, सतीश माने संभाजी आरमार शहराध्यक्ष आण्णा लटके आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *