स्काय वॉकवरुन दर्शन बारी सुरु

पंढरपूर (प्रतिनिधी):- वारकरी व भाविकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यास प्रशासन व मंदिर समितीने प्राधान्य दिले असून श्रीं च्या पद दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसाठी मंदिर समितीच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्काय वॉक वरुन दर्शनबारी सोडण्यात आली.
            स्काय वॉक वरुन दर्शन बारी वळवितांना उपविभागीय अधिकारी संजय तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रवींद्र कुलकर्णी, पोलीस उपअधिक्षक अमरसिंग जाधव,पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, मंदिर समितीचे राजेंद्र सुभेदार यांच्यासह  पोलीस व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *