कोपर्डी अत्याचार…अ.भा.छावा पंढरपूरने केला कँडल मार्च काढून निषेध

पंढरपूर (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची निघृण हत्या केल्याच्या घटनेचा अ.भा.छावा मराठा युवा संघटन पंढरपूरच्या वतीने आज दि.17 जुलै रात्री साडे सात वाजता येथील छत्रपती शिवाजी चौक येथे कँडल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

कोपर्डी येथील घटना ही अत्यंत अमानुष व जनावरांनाही लाज वाटावी अशी माणुसकीला काळीमा फासणारी व महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत निंदणीय ठरेल अशी घटना आहे. या घटनेत सामील असलेल्या तीघा नराधम आरोपींना आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केलेली आहे; परंतु यामध्ये अनेक नराधम क्रुर आरोपींचा सहभाग आहे. यातील मोकाट असलेल्या बाकीच्या आरोपींच्या मुसक्या तात्काळ आवळून त्यांना जेरबंद करावे, निर्भया अत्याचार व हत्याकांड प्रकरणानंतर कायद्यामध्ये जो बदल करुन कडक कायदा अस्तित्वात आला. त्यानुसार याप्रकरणीही जलदगतीने कारवाई व्हावी व या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

 फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे या गुन्ह्यात सामील असलेल्या सर्व आरोपींना अटक करावी. सदर प्रकरणातील पीडीत कुटुंबाला 25 लाखाची तातडीची मदत करण्यात यावी. आरोपींच्या कुटूंबियांकडून कोपर्डी गावात सतत दहशत पसरवली जाते व त्याद्वारे जाती व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तरी आरोपींच्या कुटूंबियांचा पुर्व इतिहास तपासून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी. आदी मागण्याही यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या.
यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन, पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपर्डी येथील माणुसकीला कलंकीत करणार्‍या घटनेचे तीव्र पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटलेेे आहेत. पंढरपूर शहरातील युवकांमध्येही या घटनेच्या विरोधात संतापाची लाट उसळलेली आहे. परंतु अ.भा.छावा युवक संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी तरुणांना या घटनेबाबत कायदेशीर मार्गाने निषेध नोंदविण्याचे ठरले. त्याप्रमाणे आज या कँडल मार्चचे आयोजन केले होते. यावेळी निषेधाच्या घोषणा देत कायदेशीर मार्गाने निषेध नोंदविण्यात आला असून या घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ जेरबंद करुन त्यांना कठोरात कठोर शासन केले जावे. अन्यथा अ.भा.छावा युवक संघटन आपल्या पध्दतीने अत्याचारीत मुलीला न्याय देण्यासाठी आंदोलन करेल अशी प्रतिक्रिया यावेळी अ.भा.छावा युवक संघटन चे पंढरपूर शहरअध्यक्ष सागर कदम यांनी व्यक्त केली. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *