पंढरपूर (प्रतिनिधी):- भंडीशेगाव, ता. पंढरपूर च्या शिवारात कोळ्याच्या मळा या ठिकाणी ट्रक ड्रायव्हरला अडवून त्याचे हातपाय तोंड दाबुन त्याला मारहाण करत एके ठिकाणी बांधुन ठेवत त्याचे ताब्यातील 10 लाखाचा मालट्रक व त्यातील लाखोंची विदेशी दारु चोरी केल्याचा जबरी गुन्हा केलेल्या आरोपी राजु शिवराम काळे व माणिक गुलाब काळे यांची न्यायालयीन कोठडी पंढरपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी मंजुर केली आहे.
वरील आरोपींसह इतर काहींनी दि. 10 मे 2016 रोजी पहाटे 00.30 वाजण्याच्या सुमारास भंडीशेगाव, ता. पंढरपूर च्या शिवारात कोळ्याच्या मळा या ठिकाणी मालट्रक अडवुन ड्रायव्हरचे हातपाय तोंड दाबुन त्याला मारहाण करत बांधुन ठेवत त्याचे ताब्यातील मालट्रकसह त्यातील विदेशी दारु असा 58 लाख 82 हजार 800 रुपयांचा मालाची जबरी चोरी केली होती. याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दि. 12 मे 2016 रोजी गुन्ह्याची नोंद झालेली होती. याचा तपास होऊन आरोपीसह 58 लाख 82 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. आरोपींना अटक करुन न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना 29 जुलैपर्यंत पोलिस कस्टडी सुनावलेली होती.
आज दि. 29 जुलै रोजी पुन्हा यातील आरोपींना पोलिसांनी न्यायालयात उभे करुन 7 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. परंतु आरोपींचे वकील अॅड. ओंकार बुरकूल यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायमुर्ती शिंदे यांनी वरील दोन आरोपींना पोलिस कस्टडी न सुनावता न्यायालयीन कोठडी मंजुर केली आहे. न्यायलयीन कोठडी मिळालेले आरोपी राजु शिवराम काळे (वय-24), रा. मस्सा, ता. कळंब, जि.उस्मानाबाद व आरोपी माणिक गुलाब काळे (वय-25), रा. कासारखाणे, ता.वाशी, जि. उस्मानाबाद या आरोपींच्या वतीने अॅड. ओंकार बुरकूल यांनी न्यायालयात बाजु मांडली.
नवनाथ सोमनाथ होळकर (वय-39) रा. मु.पो. रावडी खुर्द, फलटण, जि.सातारा या ट्रकचालकाने पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दि. 12 मे 2016 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार पुणे पंढरपूर रोडवरुन विदेशी दारुची वाहतुक करणार्या टाटा कंपनीचा मालट्रक (एम.एच. 12-एफ. झेड. 9544) भंडीशेगाव, ता. पंढरपूर च्या शिवारात कोळ्याच्या मळा या ठिकाणी अडवुन ड्रायव्हर होळकर याचे हातपाय तोंड दाबुन त्याला मारहाण करत बांधुन ठेवत त्याचे ताब्यातील 10 लाखाचा मालट्रक व त्यातील विदेशी दारु चोरी केल्याचा जबरी गुन्हा या आरोपींनी केला होता. पंढरपूर तालुका पोलिसांनी या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालट्रकसह लाखोंची विदेशी दारु वेगवेगळ्या ठिकाणाहुन ताब्यात घेण्यात व आठ आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळविले होते. या गुन्ह्यात ड्रायव्हरला एका ठिकाणी डांबण्यात आले. त्यानंतर त्याला एका शेतात बांधुन सोडण्यात आले. मात्र ड्रायव्हरने मोठ्या हिकमतीने आपली सुटका करुन घेत पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन गाठुन आपली फिर्याद नोंदविली होती. तालुका पोलिसांनी शिताफीने या गुन्ह्याची गंभीरता ओळखून शीघ्र गतीने गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळविलेले होते. या जबरी गुन्ह्यातील आरोपींच्या निकालाकडे संपुर्ण पंढरपूर तालुक्यातील जनतेसह अनेकांचे लक्ष लागुन आहे.
Posted inCrime

