लावणी तमाशा लोककलावंतांच्या मांगण्याबाबत ना. विनोद तावडे याचे कडे बैठक

मुंबई(प्रतिनिधी) (प्रतिनिधी) (प्रतिनिधी)01 : महाराष्ट्राची लोकपरंपरा म्हणून लावणीची ओळख आहे. साहित्य, संगीत, अभिनय यांचा एकत्रित संगम लावणी मधून पहावयास मिळतो. या लोककलेची जपणूक करीत असलेल्या कलावंतांच्या व्यथा, मागण्या संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांचे दालनामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांचे मागणीस्तव विशेष बैठक आयोजित केली होती.

याबैठकी प्रसंगी सांस्कृतिक कार्यसचिव वल्सा नायर, अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरूण मुसळेसह अनेक लावणी तमाशा कलावंत उपस्थित होते. या लोककलावंतांनी प्रामुख्याने मागणी केलेप्रमाणे, सालाबादप्रमाणे मार्चमध्ये राज्य शासनाच्या वतीने मुंबई येथे राज्यस्तरीय लावणी महोत्सव घेणेत यावा, लोककला अनुदानामध्ये वाढ करून संगीत बारी पार्टीसाठी दहा वर्षासाठी असणारी अनुदानाची अट पाच वर्षे करावी, राज्यातील लोककला आर्थिक अनुदान शिफारस समितीमध्ये तमाशा महासंघाच्या दोन प्रतिनिधीस प्रतिनिधीत्व मिळावे, तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृध्द कलावंत मानधन समितीमध्ये लावणी, तमाशा, नृत्य शासन निर्णयाप्रमाणे किमान दोन कलावंतांना प्रतिनिधीत्व देणेत यावे, लोकनाट्य व कलाकेंद्रांचा लोककला अनुदानामध्ये समावेश करावा, राज्यातील वयोवृध्द कलावतांना मासिक मानधन सरासरी रू.5000/- मिळावे. तसेच गृह संकुलासाठी जागा उपलब्ध होवून कमी व्याजदराने अर्थसहाय्य मिळावे व संगीतबारी पार्टीसाठी चाचणी परिक्षा घेण्याबाबतची अट रद्द करावी.

यावर सांस्कृतिक कार्यमंत्री ना.विनोद तावडे यांनी आमदार प्रशांत परिचारक व कलाकारासमवेत चर्चा करताना लोककलेची जपणूक करून महाराष्ट ्राची पारंपारिक लावणी तमाशा सादर करणार्‍या कलावंताच्या मागण्याबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून निर्णय घेतला जाईल, तसेच लावणी प्रशिक्षण, संगीत आकादमीसाठी जागा उपलब्ध करून संकुल उभारणी, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी मदत शासनातर्फे केली जाईल, असे आश्‍वासित केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *