पंढरीत ट्रान्सपोर्ट चे गोडाऊनला आग लागुन 5 लाखाचे नुकसान

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज पंढरपूर शहरातील सेंट्रल नाका येथील एका ट्रान्सपोर्ट च्या गोडाऊनला आग लागल्याने 5 लाख रुपयांचे नुकसा झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या दुर्घटनेची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.  याबाबत ट्रान्सपोर्ट मालक नितीन नंदकुमार कदम (वय-34), रा.कडबे गल्ली, पंढरपूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहर पोलिसांकडून समजलेल्या वृत्तानुसार दि. 1 ऑगस्ट 2016 रोजी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणाने वरील ठिकाणी असलेल्या ट्रान्सपोर्टच्या गोडाऊनला आग लागली. यामध्ये 1 भांगडी डाग, अ‍ॅटोमोबाईल डाग, केबल बंडल, वह्या, पुस्तके    बंडल, कापडी गाठी, मेडीकल डाग जळून एकुण 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अधिक तपास पोलिस हवालदार ननवरे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *