पुंडलिक मंदिरात शिरले चंद्रभागेचे पाणी… दगडी पुल पाण्याखाली! दोन-तीन वर्षातून प्रथमच चंद्रभागा दुथडी भरुन वाहतेय!

पंढरपूर (प्रतिनिधी):- नीरा नदीच्या पात्रात वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग सुरु असून हे पाणी नीरा नदीतून चंद्रभागेच्या पात्राद्वारे पंढरपूरमध्ये कालच पोहचले आहे.
यामुळे पंढरपूर च्या चंद्रभागा नदीच्या बंधार्‍याची दरवाजे दोन वर्षानंतर प्रथमच काढण्यात आली.
येथील जुना दगडी पुल पाण्याखाली गेला असून पुंडलिक मंदिरातही पाणी शिरले आहे.

दोन तीन वर्षातून प्रथमच चंद्रभागेचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. 2008 पासून पाऊसकाळ कमी असल्याने चंद्रभागेला पुर आलाच नाही. या वर्षी मात्र चंद्रभागेचे पात्र दुथडी भरल्याने चंद्रभागेचे हे रुप पहाण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे.
जिल्हाधिकार्‍यांनी नदीकाठच्या गावातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहत आहे. वाळु उपशामुळे चंद्रभागेच्या पात्रात खड्डे आहेत. त्यामुळे भाविकांनी व नागरिकांनी चंद्रभागेच्या पात्रात स्नान करताना काळजी घ्यावी. तसेच प्रशासनाच्या सतर्कतेच्या इशाराची दखल घेऊन पात्रातील पाण्यात दुरवर जाऊ नये.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *