अच्छे दिनच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकºयांची क्रुर धट्टा सुरू केली- माजी मंत्री सुरेश धस

पंढरपूर : अच्छे दिनच्या नावाखाली भाजप सरकारने शेतकºयांची
क्रुर धट्टा सुरू केली आहे़ या सरकारच्या काळात कोणत्या शेतमालाला जादा भाव
मिळाला सांगा? असा प्रश्न उपस्थित करून मोदी लाटेत भाजपाला मते देऊन आपली
फसवणूक झाल्याचे शेतकरी आता बोलून दाखवत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री
सुरेश धस यांनी केले़
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युवराज पाटील व नगरसेवकांच्या प्रचारार्थ
शिवतीर्थावर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते़
व्यासपीठावर माजी जि़ प़ अध्यक्ष बळीराम साठे, प्रांतिक सदस्य
राजूबापू पाटील, तालुकाध्यक्ष दीपक पवार, शहराध्यक्ष दीपक वाडदेकर, चिटणीस
लतिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संकेत ढवळे, संदीप मांडवे,
मारुती जाधव, नगराध्यक्ष पदाचे उमदेवार युवराज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी
व राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार उपस्थित होते़ 
सुरेश धस म्हणाले, विरोधक पंढरपूरच्या विकासासाठी कोट्यवधींचा
निधी आणल्याचे सांगतात़ मग शहराचा विकास करायला कोण रोखले का? अन्य
तीर्थक्षेत्रांबरोबर पंढरपूरचा विकास का झाला नाही? त्यांच्या केवळ
कोटीच्या गप्पाच ऐकायच्या का? आता बस झाले, विकासाभिमूक नेतृत्वाचा स्वीकार
करा़ असे नेतृत्व असलेले उमेदवार राष्ट्रवादीने युवराज पाटील यांच्या
रुपाने दिले आहे़ त्यामुळे मतदारांनी राष्ट्रवादीच्याच पाठिशी राहावे, असे
आवाहन त्यांनी केले़
राज्यातील भाजपा-सेनेची अवस्था तर ‘तुझे माझे जमेना,
तुझ्यावाचून करमेना’ अशी झाली आहे़ यांच्या भांडणात राज्याचे नुकसान होत
आहे़ कोणत्याही शेतमालाला योग्य भाव मिळेना झालाय़ कांद्याला एका किलोला १०
रुपये खर्च येतोय तर ३० पैशांनी कांदा बाजार समितीमध्ये विकला जातोय़
टोमॅटोची स्थिती काही वेगळी नाही़ काय केलंय या सरकारने शेतकºयांसाठी? असा
सवाल उपस्थित करून शेतकºयांसाठी भांडणारे, आंदोलन करणारे नेते राजू शेट्टी,
सदाभाऊ खोत कुठे गेले? त्यांना आता शेतकºयांविषयी कळवळा राहिला नाही़
त्यांनी शेतकºयांना वाºयावर सोडले आहे़ मात्र राष्ट्रवादीने यापूर्वीही पीक
कर्ज माफ शेतकºयांना न्याय मिळवून दिला़ शेतमालाला भाव दिला होता़
राष्ट्रवादी नेहमी शेतकºयांच्या पाठिशी राहणारा पक्ष आहे़ त्यामुळे
मतदारांनी राष्ट्रवादीला साथ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले़

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *