![]()
पंढरपूर-‘येथील धुळ व
खडयामुळे पंढरपूरकरांचे आरोग्य बिघडत चालले आहे हे थांबविण्यासाठी डॉ. रोंगे
सरांना नगरपरिषदेवर नगराध्यक्ष म्हणून पाठवा. ते सर्व योजनांचा उत्तमरित्या
पाठपुरावा करतील आणि पंढरपूरचा विकास साध्य करतील. काहीजण या पक्षातून त्या पक्षात
जा – ये करत कोलांडया उडया मारत असल्यामुळे पंढरपूरचा विकास झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या
डॉ. बी.पी.रोंगे सरांना संधी देवून लुटूपुटूचे राजकारण करणाऱ्यांना घरी बसविण्याची
वेळ आली आहे. सामन्यांच्या न्याय हक्कासाठी सर्वात प्रथम शिवसेना धावून येते. केवळ
पंढरपुरचा विकास करण्यासाठी एक वेळ शिवसेनेला नेतृत्व करण्याची संधी द्या. शिवसेनेने
राज्यात कुठेही तडजोड न करता रोखठोक कार्य केल्यामुळे शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या
नगरपालिका, महानगरपालिका, महाराष्ट्रातील काही तालुके हे क्षेत्र शिवसेनेच्या
भक्कम पाठपुराव्यामुळे विकासाकडे जात आहेत. आता पंढरपूरला देखील विकासाकडे
नेण्यासाठी योग्य व सक्षम नेतृत्व असणारे डॉ. रोंगे सर यांच्याकडे नगरपालिकेचे
नेतृत्व सोपवा.’ असे आवाहन शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या आ. निलमताई गोऱ्हे
यांनी केले.

पंढरपूर नगरपरिषद
सार्वत्रिक निवडणूक २०१६ च्या निमित्ताने शिवसेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ.बी.पी.रोंगे
व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ त्या पंढरपुरात पत्रकार
परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना शिवसेनेचे आज, काल आणि उद्याची भूमिका त्या
मांडत होत्या.
निवडणुकीच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज
पंढरपुरात आले होते. पुढे बोलताना आ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘महाराष्ट्राची
अध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरची होणारी अधोगती
थांबविण्यासाठी उच्चशिक्षित डॉ. रोंगे सरांचे नेतृत्व सक्षम व भक्कम ठरणार आहे. हे
विकासाचे पर्व असून पंढरपूर जनतेने नगरपरिषदेवरील शिवसेनेच्या ऐतिहासिक विजयाचे
साक्षीदार व्हावे आणि हीच योग्य वेळ आहे.शिवसेनेवर विश्वास टाकल्यामुळे ६३ आमदार
निवडून आले आहेत तर काही नगरपालिका व महानगरपालिका सेनेच्या ताब्यात आहेत. शिवसेना
अहोरात्र गोरगरिबांच्या कल्याणासाठी राबत असून आता पंढरपूरचा विकास करण्यासाठीच एक
सक्षम नेतृत्व दिले आहे. शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांच्या माध्यमातून विकास कामे
पुर्ण होतील यासाठी पंढरपूर जनतेने शिवसेनेचे डॉ.बी.पी.रोंगे यांच्या धनुष्यबाणाला
विक्रमी मताधिक्याने निवडून आणावे.’असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकारांच्या काही प्रश्नांना
समाधानकारक उत्तर दिले. ‘जे शिवसेनेत आहेत ते मावळे आणि जे उडून गेले ते कावळे’
असे सांगून त्यांनी केवळ विकासाचेच मुद्यावर लक्ष केंद्रित केले होते. पंढरपुरातील
मंदिरातील नोटांची चौकशी करण्याची लक्षवेधीतून मांडणार असल्याचेही त्यांनी आवर्जून
सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, महिला
आघाडी जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड, निरीक्षक संतोष माने, माजी जिल्हाप्रमुख
साईनाथ अभंगराव, नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे,
उपजिल्हाप्रमुख महावीर देशमुख, तालुकाप्रमुख संभाजी शिंदे,माळशिरस महिला आघाडीच्या
तालुकाप्रमुख ज्योती कुंभार, माजी उपजिल्हाप्रमुख व शिवसेना निवडणूकप्रमुख महेश
साठे, प्रचार प्रमुख माजी शहराध्यक्ष रवींद्र मुळे, राहुल कौलगे पाटील,सिद्धू
कोरे, शिवसेनेचे उमेदवार संदीप केंदळे, पदादिकारी, उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते.

छायाचित्र- शिवसेनेच्या
प्रवक्त्या व उपनेत्या आ. निलमताई गोऱ्हे ह्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या
संदर्भात माहिती घेण्यासाठी आले होते.यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डावीकडून लक्ष्मीकांत
ठोंगे पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे, अस्मिता
गायकवाड, निरीक्षक संतोष माने, संभाजी शिंदे, महावीर देशमुख व पदाधिकारी