शहीद मेजर कुणाल गोसावींचे पार्थिव पंढरपूरमध्ये गुरुवारी आणण्याची शक्यता… तहसीलदार नागेश पाटील यांची माहिती

पंढरपूर (भगवान वानखेडे):- शहीद मेजर कुणाल गोसावींचे पार्थिव पंढरपूरमध्ये गुरुवारी आणण्याची शक्यता…  तहसीलदार नागेश पाटील यांची माहिती पंढरपूरचे सुपुत्र मेजर कुणाल गोसावी यांचे पार्थिव येत्या गुरुवारी म्हणजेच १ डिसेम्बर रोजी आणण्यात येईल अशी माहिती पंढरपूरचे तहसीलदार नागेश पाटील यांनी पंढरपूर लाईव्ह शी बोलताना दिली. 
जम्मू काश्मीर मधील नगरोटा सांबा सेक्टर येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांशी लढताना आज पहाटे साडे पाच वाजता पंढरपूरचे वीर सुपूत्र मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी हे शहीद  झाले आहेत. 
कुणाल हे पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक मुन्नागिर गोसावी यांचे सुपूत्र होत. अत्यंत उमद्या स्वभावाचे व मनमिळावू असणारे कुणाल गोसावी यांचा पंढरीत मोठा मित्रपरिवार आहे.  दहशतवाद्यांशी लढताना धारातिर्थी पडलेले कुणाल गोसावी हे फक्त २८  वर्षाचे होते. चार वर्षापूर्वी ते सैन्यात दाखल  झाले होते.  चार वर्षांपूर्वी ते सैन्यात दाखल झाले होते. मंगळवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे दोन वीर शहीद झाले आहेत. नांदेडमधील लोहा तालुक्यातील जानापुरी येथील संभाजी कदम यांनाही वीरमरण आले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *