सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कडून गोसावी कुटूंबाचे सांत्वन

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कडून गोसावी कुटूंबाचे सांत्वन

पंढरपूर दि. 11-  जम्मू- काश्मिर येथील नागरगोटा येथे शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटूंबियांची सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भेट  घेवून सांत्वन केले.

 यावेळी सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली व  गोसावी कुटूबांची आस्थेने चौकशी केली. शहिद कुणाल गोसावी यांचे  वडील मुन्नागीर गोसावी, चुलते सुभाषगीर गोसावी, भाऊ अमित व समिर गोसावी तसेच इतर नातेवाईक उपस्थित होते. सहकारमंत्री श्री.देशमुख यांनी शहिद मेजर कुणाल गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांच्याकडून संपूर्ण कुटूबांची माहिती घेतली व शासनस्तरावर  आवश्यकती  लागणारी मदत करु असेही सहकार मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.  

 यावेळी  नगरसेविका शकुंतला नडगिरे, सहायक निंबधक पी.टी.घुगे, शहर पोलिस निरिक्षक विठ्ठल दबडे, सी.पी.बागल, राजकुमार पाटील तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                   000000

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *