सौ. साधनाताई भोसले यांनी स्वीकारला नगराध्यपदाचा पदभार….
उपनगराध्यक्षपदी सौ. सुजाता बडवे.. चार स्वीकृत नगरसेवकांची निवड
पंढरपूर (भगवान वानखेडे) पंढरपूर नगरपरिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या नुतन कारभार्यांचा म्हणजेच नगराध्यक्षा, नगरसेवक यांचे कामकाज आज दि. 30 डिसेंबर पासून खर्या अर्थाने सुरु झाले आहे. आज नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी आपला अधिकृत पदभार स्वीकारला. आज झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ. सुजाता बडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर भाजपा चे नुतन स्वीकृत सदस्यपदी ॠषीकेश उत्पात, काँग्रेस आय चे नुतन स्वीकृत सदस्यपदी आशिष डोंबे तर पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्या नुतन स्वीकृत सदस्यपदी दत्तात्रय (नाना) कवठेकर, नरसिंह (नारायण) सिंघण यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी सौ. साधना नागेश भोसले यांनी घोषीत केले.
सुत्रसंचालन अधिकारी सुनील वाळुजकर यांनी केले तर आभार अनिल अभंगराव यांनी मानले



