सोलापुरातील चार सराफ दुकांनावर आयकर विभागाचे छापे

सोलापुरातील चार सराफ दुकांनावर आयकर विभागाचे छापे

नोटा बंदीनंतर बँकांमध्ये  कोट्यवधी रुपयांची रक्‍कम जमा झाल्याचे निदर्शनास आल्यावरून आयकर विभागाने सोलापूर येथे चार सराफी व्यवसायिकांवर छापे टाकले. नोटा बंदीच्या निर्णयानंतर सोलापूरमध्ये टाकण्यात आलेल्या आयकर छाप्याने सराफ व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सोलापुरातील काही सराफ व्यावसायिकांनी रद्द केलेल्या 1000 व 500 च्या नोटा स्वीकारून चढ्यादराने सोन्याची विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. 

यामध्ये स्थानिक सराफांचा सहभाग असल्याच्या संशयावरून आयकर विभागाच्या कोल्हापूर व पुणे येथील पथकाने बुधवारी सायंकाळी येथील चार सराफ पेढ्यांवर छापा टाकून चौकशी केली. या चौकशीमध्ये सराफांकडून सोने खरेदी व्यवहाराची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे समजते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे सराफी व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *