👁 7 Views

नवरदेवाला हसत -खेळत हळद लावत होता व्यक्ती, पुढच्याच क्षणात होत्याच नव्हत झालं

 

गेल्या काही दिवसांपासून अचानक होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मृत्यू कधी कुठे आणि कुणाला कसा गाठेल हे सांगता येत नाही. चालता-बोलता, नाचता-गाता, जिममध्ये किंवा हसता खेळता मृत्यू ओढावल्याची बरीच प्रकरणं समोर आली आहे.


आता अशीच आणखी एक धक्कादायक घटना हैद्राबाद येथून समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की एका घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. यादरम्यान घरातील लोक नवरदेवाला हळद लावताना दिसत आहेत. इतक्यात एक व्यक्ती हसत-खेळत नवरदेवाला हळद लावण्यासाठी समोर बसतो आणि त्याला हळद लावू लागतो. मात्र, यानंतर अवघ्या काही सेकंदातच तो खाली कोसळतो.


हा व्यक्ती खाली कोसळताच तिथे उपस्थित असलेले इतर लोकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. सध्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये नवरदेवाला हळद लावताना सदर व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.


व्हिडिओमध्ये महिला आणि लहान मुलांच्या किंचाळण्याचाआवाजही येत आहे. मनोज काका या ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मनोज हे समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आहेत. व्हिडिओ शेअर करण्यासोबतच मनोज सिंह यांनी सवाल केला आहे. देशात अशा घटना खूप वाढल्या आहेत. ‘सरकारने यामध्ये लक्ष घालावं, याचं नेमकं कारण समजायला हवं असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *