चंदनाची उटी माझ्या विठु रखुमाईला… आजपासून श्रीविठ्ठल रुक्मिणीस चंदन उटीचा लेप..
पंढरपूर– ऊन्हाळ्यात पंढरीच्या विठोबा रखुमाईला चंदनाची उटी लावण्याची परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे आज पासुन श्री विठ्ठल – रुक्मिणीला चंदन उटीचाचा लेप लावण्यास सुरवात झालीय .
मृग नक्षत्र निघेपर्यंत दररोज देवाला ही चंदन उटी लावण्यात येते. मार्च महिण्यातच राज्यात उन्हाचा तडाका जाणवू लागलाय .सामान्य माणसाबरोबरच देवालाहि ऋतू मानानुसार त्रास सहन करावाच लागतो . देवाला या उन्हाचा त्रास कमी व्हावा या हेतुने ही पुजा केली जाते . पुजा करण्याची संधी भाविकानां मिळते . या पुजेचे खुप महत्व असून भाविक चंदन उटी पुजेची आवर्जून प्रतिक्षा करतात . श्री विठ्ठलाला चंदन उटीचे शुल्क १५ हजार रुपये तर रुक्मिणी मातेला ७ हजार ५०० आहे . मोठ्या भक्ती भावाने शेकडो भाविक या पुजेचा लाभ घेतात.
Posted inPandharpur Live News
