दारूच्या दुकानच्या ५००मीटरपर्यंत कोणताही रस्ता नसावा

दारूच्या दुकानच्या ५००मीटरपर्यंत कोणताही रस्ता नसावा

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर दारूविक्रीस बंदी घातली असून यासंदर्भात अखिल भारतीय अपघातग्रस्त नातेवाईक संघटनेने प्रतियाचिका सादर केली व लांब लांबून येणारे मद्यपी वाहने वाकडी वाट करून ५०० मीटर आत गाडी नेतील आणि दारू पितील व अपेक्षित परिणाम साधला जाणार नाही अशी भीती व्यक्त केली. या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सुधारीत निकाल दिला असून, महामार्गापासून ५०० मीटर लांब मद्यविक्रीस परवानगी देताना, या जागेच्या चारही बाजुंना कुठल्याही प्रकारचा रस्ता असू नये अशी अट टाकली आहे.

बार अशा ठिकाणीच उघडता येईल ज्या जागेपर्यंत जाण्यासाठी ५०० मीटर अंतर चालतच जावे लागेल अशी अट न्यायालयाने घातल्यामुळे बहुतांश मद्यपींची इच्छा मरेल आणि त्यातही जे जातील ते परत चालत येताना शुद्धीवर येतील असा यामागचा आडाखा आहे.

त्यातही ज्या जागा उंचसखल आहेत, आजुबाजुला प्रचंड खड्डे आहेत, डंपिंग ग्राउंड आदी आहे अशा ठिकाणी बार उघडण्यास अग्रक्रमाने परवानगी द्यावी असा आदेशही न्यायालयाने सरकारला दिला आहे. सरतेशेवटी एकदा अशा जागी बारला परवानगी दिली की त्यानंतर बारचे अस्तित्व असेपर्यंत त्याच्या चारही बाजुंना ५०० मीटर अंतरापर्यंत रस्ता बांधता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल माननीय न्यायालयाने दिला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *