![]()
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडी बिनविरोध…
सोलापूर दि ३ : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापतींच्या निवडी सोमवारी बिनविरोध झाल्या़ सभापती निवडीतही राष्ट्रवादीने माघार घेतल्याने या निवडी बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले़
सोमवारी निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती निवडी पार पाडल्या़ यात
*समाजकल्याण समिती : शिला शिवशरण,*
*महिला व बालकल्याण समिती : रजनी बाळासाहेब देशमुख,*
*अर्थ व बांधकाम समिती : विजयराज डोंगरे,*
*कृषी व पशुसंवर्धन समिती : मल्लिकार्जुन पाटील,*
*शिक्षण व आरोग्य विभाग समिती : शिवानंद पाटील,*
*विरोधी पक्षनेता म्हणून बळीराम साठे* तर *सभागृहनेता म्हणून आनंद तानवडे* यांची निवड करण्यात आली़
