सती पतीने मिळून केलेली भक्ती शिवाला मान्य होते, सती पतीने एक न होता केलेली भक्ती अमृतात विष कालविल्याप्रमाणे आहे !-अभिषेक देशमाने

सती पतीने मिळून केलेली भक्ती शिवाला मान्य होते,
सती पतीने एक न होता केलेली भक्ती अमृतात विष कालविल्याप्रमाणे आहे !-अभिषेक देशमाने

सांगोला-
दिनांक २ एप्रिल, २०१७ रोजी सांगोला येथील  बसव विचारक सुरेश मल्लिकार्जुन पाटिल यांचे बंधु         अष्टावरणसंपन्न चिरंजीव शरण सुयश आणि सांगली जिल्ह्यातील कुमठे येथील अष्टावरणसंपन्न चिरंजीव शरणी अमृता यांचा कल्याणमहोत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला. 

हर गुरु बसवण्णा आणि शरणांच्या कृपाशीर्वादाने, जेष्ठांच्या आशीर्वादाने, गुरु-लिंग-जंगम यांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या मंगलमय उपस्थितीत, चिरंजीव अष्टावरणसंपन्न शरण सुयश आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी अष्टावरणसंपन्न शरणी अमृता हे दोघेही सती-पती आपल्या संसाररुपी नौकेला गतिमान केले.

या कल्याणमहोत्सव प्रसंगी उस्तुरी विरक्त मठाचे गुरुवर्य प.पु. कोरनेश्वर आप्पाजी आणि प. पु. रुद्रपशुपती  कोळेकर महास्वामीजीं उपस्थित होते. परमपूज्य कोरणेश्वर आप्पाजीनी या कल्याणमहोत्सव प्रसंगी लिंगायत धर्मातील कल्याणमहोत्सव म्हणजे लग्नसोहळ्याचे महत्व समजावून सांगितले.  

ह्या कल्याणमहोत्सवात  तुडविण्याचा गुग्गुळविधी, 

शरण स्वागत , प्रार्थना, षडस्थल ध्वजारोहण, वचनप्रतिज्ञा, कंकनबंधन, विभूतिधारणा, रुद्राक्षधारण, वचनगाठ, वचनसुत्र आणि पुष्पवृष्टी करून हा कल्याणमहोत्सव साजरा झाला. ह्या कल्याणमहोत्सवाला वचनमूर्ती म्हणून सौ. सविता नडकट्टी आणि समूह यांनी वचनोक्तसंस्कार केले, अतिशय मधुर आवाजात वचन गायन केले. त्यांच्या या सुंदर संस्कार पद्धतीने संपूर्ण आप्त बांधव मंत्रमुग्ध झाले. 

या कल्याणंमहोत्सव प्रसंगी कोरणेश्वर अप्पजीचे दिव्य सानिध्य प्राप्त झाले तसेच आलूर अनुभवमंटप मधील अभ्यासू शरण हणमंतप्पा शँके यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले, याशिवाय सांगली जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित असलेले शरण नामदेव कोरे सर, श. अभिषेक देशमाने, पंढरपूर येथून श. संदीप तवटे, सोलापूर  अमोल पाटील यांनी आपली प्रमुख उपस्थिती नोंदविली. अभिषेक देशमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कल्याणमहोत्सवाचे महत्व आणि इतिहास सांगितला, वचनसाहित्य रक्षणासाठी सर्वांनी तत्पर राहावे आणि अशा पद्धतीने लिंगायतानी सर्व संस्कार वचनांच्या साहाय्याने करावेत , असे आवाहन त्यांनी केले. संदीप तवटे यांनी या कल्याणमहोत्सवाचे प्रसंगी उत्तम नियोजन केले होते, हा नाविन्यपूर्ण सोहळा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आंध्रप्रदेश या भागातून पाहुणे मंडळी,आप्तजन,बसवप्रेमी आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *