जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥ ….क्षीरापती च्या भजनाने झाली चैत्री वारी ची सांगता…. श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन जड अंत:करणाने वारकर्‍यांनी घेतला पंढरीचा निरोप…

क्षीरापती च्या भजनाने झाली चैत्री वारी ची सांगता….
श्रीविठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन जड अंत:करणाने वारकर्‍यांनी घेतला पंढरीचा निरोप…

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 8 एप्रिल 2017
आज द्वादशी चे दिवशी वारकरी सांप्रदायाचे परंपरेप्रमाणे क्षीरापतीच्या भजनानंतर चैत्री वारीची सांगता झाली. अनेक वारकर्‍यांनी जड अंत:करणाने पांडुरंगाचं सावळं गोजीरं रुप मनात साठवून जड अंत:करणाने पंढरीचा निरोप घेतला.

जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता॥ हा भाव मनी ठेवून कांही वारकरी शिखर शिंगणापूरकडे शंभू महादेवाचव्या यात्रेसाठी रवाना झाले. तर कांहीजण आपापल्या गावी रवाना झाले. चैत्री वारीला बहुतांश महाराष्ट्राच्या विदर्भ व मराठवाड्यातून वारकरी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यातील अनेकजण पंढरपूरच्या वारीनंतर शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या यात्रेसाठी जात असतात.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *