बिलोली तालूक्यातील नागनी येथे वाळु तस्करांचा सुळसुळाट
महसुल प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष
बिलोली प्रतिनिधी (दि. 10) तालूक्यातील मौजे नागणी येथिल मांजरा नदी पाञातून रेतीचे ठेकेदार दररोज रांञदिवस वाळू चार ते पाच जेसीबी द्वारे अमाप उत्खनन करुन . फार मोठ्या प्रमानात वाळूची तसकरी तेलंगणा ,महाराष्ट्र ,आंध्राप्रदेश मध्ये वाळूची करीत आहे. शासनाची लाखोची संपत्तीची लूट सर्रासपने चालूच असून सदर प्रकरणात तालूका महसुल प्रशासन चिडीचीप आहे. सदर प्रकरणात तलाटी मंडळ अधिकारी संबंधित महसुल नायब तहसिलदार कानाडोळा करीत शासनाची तिजोरी जोपासणारे महसुल अधिकारी रेती तस्करांना रानमोकळे करुन देत आहेत. यात तीळमाञ शंका नाही सध्या राज्यात स्वच्छ व भ्रष्टाचार मुक्त सरकार असतांना बिलोली तहसिल हद्दीतून दररोज लाखो ब्रास रेती चोरीला जात आहे ही अतिशर्मनाक बाब आहे. या प्रकरणी जातीने लक्ष वेधून तात्काळ कार्यवाही करुन जेसीबी जप्त करावी दोषीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मांगणी पञकारांच्या निवेदना द्वारे करण्यात आली असून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्य मोहमद मोकरम फारुखी यांनी अवैध उत्खनना बाबत होत असलेली तस्करी डुप्लीकेट राँयलटी , गौण खनिजचे नायब तहसिलदार व सज्जा तलाटी संबंधित नागणी येथिल मंडळ अधिकारी यांची सखोल चौकशी करुन तात्काळ निलंबीत करण्यात यावी. अन्यथा भ्रष्टाचार कर्मचा-याची योग्य चौकशी करुन निलंबीत न केल्यास दि 15/04/2017 रोजी अवैध वाळूचे वाहने पकडून तहसिल कार्यालयात आनण्यात येईल असा इशारा उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे निवेदना द्वारे तक्रार दिली
तर पञकारांच्या वतीने सय्यद रियाज, संजय कुमार पोवाडे, प्रकाश , वैभव घाटे, ईलियास फारुखी, गौतम भालेराव, सुरेश देवकरे, फुगारे लक्ष्मणन कांबळे, माधव मोतेवार, अदि पञकार यांनी दोषीवर उचित कडक कार्यवाही न केल्यास दि.15/04/2017 रोजी आपल्या कार्यालया समोर विविध आंदोलने करुन नागणी रेथिल रेती घाटवर आणी कुंडलवाडीकडे येणार्या रोडवरती ओव्हर लोडीग ट्रिपर टारस आठ चाकी आणी बारा चाकी वाहनांना अडुन प्रशासनाला जागवन्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा पञकारांच्या वतीने उपजिल्हा अधिकारी व, तहसिलदारसाहेबांना निवेदणाद्वारे तक्रार करण्यात आले
