![]()
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने यावर्षी प्रथमच भगवान महावीर यांची जयंती साजरी
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 9 एप्रिल 2017
अहिंसेचे मुर्तिमंत प्रतीक समजले जाणारे जैन समाजाचे चोवीसावे तिर्थकर भगवान महावीर यांची जयंती या वर्षी प्रथमच पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते भगवान महावीरांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. जैन समाजाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार मोत्यांचे हार घालुन करण्यात आला.
सत्य, अहिंसा, अपरिग्रह अचौर्य आणि ब्रम्हचर्य ही अनुव्रतं असणारे भगवान महावीर यांनी सत्य व अहिंसेचे तत्व जगाला शिकविले. जैन समाजामध्ये आराध्ये असणार्या भगवान महावीरांची जयंती आज पंढरपूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, उपनगराध्यक्षा सौ.सुजाताताई बडवे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, कर अधिक्षक सुनील वाळुजकर, बाबुलाल शहा, नागेशकाका भोसले, नगरसेवक संदीप पवार, संग्राम अभ्यंकर, श्रेणीक दोशी, डॉ.राजेश फडे, बाहुबली जैन, अनिरुध्द बडवे, अनेक नगरसेवक, पत्रकार बंधु व जैन समाजातील बहुतांश नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने यावर्षी प्रथमच जयंती साजरी होत असल्याने जैन बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
