पंढरीत महात्मा जोतीराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी…
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 11 एप्रिल
क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या 190 व्या जयंतिनिमित्त आज पंढरपुर शहरात ठीक ठिकाणी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
संत पेठ येथील महत्मा फुले चौकातील महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या आवारात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आज शहरातील अनेक राजकीय, सामाजीक क्षेत्रातील मंडळींनी तसेच महात्मा फुले प्रेमींनी येवून म.जोतीराव फुङलऐ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला.

