लक्ष्मी वायदंडे यांचे निधन
पंढरपूर Live दि.१२ एप्रिल २०१७
येथील माजी नगरसेवक अंबादास वायदंडे यांच्या मातोश्री लक्ष्मी विठ्ठल वायदंडे (वय ७२) यांचे दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजता दुख:द निधन झाले. त्यांचे पश्चात दोन मुले, सुना, विवाहीत मुली, नातवंडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे.
आज दि.१२ एप्रिल रोजी दु.१२ वाजणेच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशान भुमी येथे त्यांचेवर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे, नगरसेवक राजु सर्वगोड, नगरसेवक महादेव भालेराव, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, महेश साठे, सुधाकर बंदपट्टे, खंडु खंदारे, रिपाईचे नेते अप्पासाहेब जाधव, संजय सावंत, किर्तीपाल सर्वगोड, संतोष सर्वगोड, रिपाई शहराध्यक्ष संतोष पवार, अमित कसबे, आण्णाभाऊ साठे संघटनेचे नानासाहेब वाघमारे, बापुसाहेब अवघडे, धनजी वाघमारे, किशोर खिलारे, अर्जुन खिलारे, बाबुराव खिलारे, क्रुष्णा वाघमारे, पत्रकार श्रीकांत कसबे, अभिराज उबाळे, रामभाऊ सरवदे, सचिन कसबे, सचिन कांबळे यांचेसह चळवळीतील व सामाजिक, राजकीय आदींसक्ष विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
