अभिनेता आमीर खानने केली पाणी फाऊंडेशनच्या कामाची पाहणी…
उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास गावास आमीर खानची अचानक भेट…
सोलापूर – दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी बुधवारी फाउंडेशनचा प्रमुख, बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक किरण राव यांनी राळेरास (ता. उत्तर सोलापूर) गावाला अचानक भेट दिली.
आमीरने गावकऱ्यांशी दिलखुलास संवाद साधताना किरण रावसोबत श्रमदानही केले. गेल्या अनेक दिवसांपासून कुदळ-फावडे घेऊन गावाला पाणीदार करण्यासाठी घाम गाळणाऱ्या ग्रामस्थांना आमीर आणि किरणच्या भेटीने मायेचा ओलावा आणि नवी ऊर्जाही दिली.
गावची नवी ओळख…
कार्यक्रमात दिनेश माने या तरुणाने मोजकेच मनोगत व्यक्त केले. याला नागरिकांनी प्रचंड टाळ्याच्या कडकडाटात दाद दिली. दिनेश माने म्हणाले, आम्ही राळेरास असे गावचे नाव सांगितले तर आम्हाला बार्शी तालुक्यातील का? असा प्रश्न विचारला जायचा. मात्र आता अामीर खान यांनी भेट दिल्यानंतर अभिमानाने आम्ही आमीर खानचे राळेरास असे उत्तर देऊ, असे स्पष्ट केले.
प्रत्येक गाव विजयी
पाणी फाउंडेशनची वॉटर कप स्पर्धा ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी आहे. आपण पहाटे श्रमदान करून कामावर जाता आणि कामावरून येऊन पुन्हा रात्री श्रमदान करता. राज्यातील प्रथम आलेल्या गावाला बक्षीस दिले जाणार असले तर या स्पर्धेनंतर जे गाव पाणीदार होईल, दुष्काळमुक्त होईल ते प्रत्येक गाव विजयीच असेल.
– आमीर खान
प्रशिक्षणादरम्यान झालेली चर्चा आणि प्रत्यक्षात काम करण्यास केलेली सुरुवात याबद्दलचा अनुभव ऐकून घेतला. राळेरासचे रहिवासी भीमा डांगरे यांच्या घरासमोर शोषखड्डा मारला तर आणखी एका ठिकाणी पत्नीसह दगडगोट्यांनी खड्डा भरून घेतला. किरण राव यांनीही मनोगतामध्ये आनंद व्यक्त करीत सर्वजण एकत्र येऊन करीत असलेले श्रमदानाचे काम पाहिल्यानंतर नक्कीच महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार असल्याचे सांगितले. या वेळी पाणी फाउंडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ, सुखदेव भोसले, ग्रामसेवक माधुरी सुरवसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
ग्रामस्थांशी संवाद : जेमतेम २५० उंबरे असलेल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास गावात बुधवारी एक अजब उत्साह होता. गावाकडे येणाऱ्या रस्त्यांवर दिवसभर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनाही नेमके कोण येणार आहे, याची माहिती नव्हती. वरिष्ठांकडून एक मोठा अधिकारी कामाची पाहणी करण्यास येणार असेच सांगण्यात आले होते. मात्र सायंकाळी वाजता आमीर खान येणार असल्याचे कळाले. सायंकाळी वाजून ५० मिनिटांनी आमीर खान पत्नी किरण राव सोबत राळेरास गावी पोहोचले. गावकऱ्यांनी जोरदार टाळ्याच्या गजरात आमीर खानचे स्वागत केले. आमीर खान यांनी मास्टर ट्रेनर, सरपंच ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला.
सरस्वतीचा वापर करा, लक्ष्मी आपोआप येईल
गावाचीआर्थिक परिस्थिती खूपच कठीण आहे. गावातील सर्वच तरुण शहरात इतर ठिकाणी मजुरीने काम करतात. यासाठी यंत्राने काम करण्यासाठी निधीची मागणी ग्रामसेविका सुरवसे यांनी केली. यावर आमीर खान यांनी आम्ही सरस्वती (ज्ञान) देतो, त्याचा वापर करून तुम्ही कामे करा. त्यातून आपोआप तुमच्याकडे लक्ष्मी येईल, असे स्पष्ट केले. यावर गावकऱ्यांनी बोला मिल के एक साथ, दुष्काळाचे दोन हात या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
पुढील स्लाइडवर वाचा, कल सुबह पाच बजे आना…
कल सुबह पाच बजे आना, आमीरने चेतवल्या ग्रामस्थांच्या श्रमदानाच्या प्रेरणा
आपने मेरा दंगल मुव्ही देखा है, उसमे मेरा एक डायलाॅग है, क्या है वो डायलॉग? क्या है? कल सुबह पाच बजे आना… हे उद्गार आहेत हिंदी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता याचे. ना सेट, ना कॅमेरा, ना कट, ना रिटेक. जेमतेम ९५० लोकसंख्या असलेल्या तेवढ्याच संख्येने संरक्षणासाठी पोलिस बंदोबस्त असलेल्या उत्तर तालुक्यातील राळेरास गावी अामीर खान यांनी श्रमदान आपल्या भाषणाने गावकऱ्यांना प्रभावित तर केलेच, शिवाय गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रेरित केले.
पाणी फाउंंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सांगोला उत्तर सोलापूर तालुक्यातील ७६ गावांनी सहभाग नोंदवला. त्यापैकीच राळेरास एक गाव. दुपारी वाजल्यापासून बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना खुद्द गावकऱ्यांनाही आमीर खान येणार याची तसूभरही कल्पना नसावी. ठीक ७.५० वाजता आमीर खान यांचे पत्नी किरण रावसह राळेरासला आगमन झाले. अलिशान गाडीतून उतरताच नागरिकांनी टाळ्याच्या गजरात स्वागत केले आणि थेट संवादाला सुरुवात झाली. सरपंच नंदिनी माने, ग्रामसेविका माधुरी सुरवसे मास्टर ट्रेनर यांनी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष गावात काम करतानाचे अनुभव कथन केले.
अजिंक्यतारा चित्रपट पाहून आम्ही खूपच प्रभावित झालो. प्रशिक्षणानंतर आम्हाला आत्मविश्वास आला. आज सर्व गाव पहाटेपासून ते रात्रीपर्यंत थकता काम करते. यावर आमीर खान यांनी ‘व्हेरी गुड’ असा शेरा मारत कामांचा पूर्ण प्लॅन तयार आहे का? असे विचारले. यावर सर्वांनी हो, असे उत्तर दिले आणि आमीर खान किरण राव यांनी श्रमदानास सुरुवात केली. स्वत: हातात कुदळ घेऊन खड्डा खणला तर किरण राव या माती टाकत होत्या. खड्डा खोदल्यानंतर फुटांचा खड्डा ते १० मिनिटांत दगडगोट्यांनी भरून घेतला, कोणाच्याही मदतीविना. वॉटर कप स्पर्धे ही राज्यातील १५ जिल्ह्यातील ३० तालुक्यातील हजार ३१५ गावांमध्ये राबविली जात आहे. एप्रिल ते २२ मे या कालावधीत स्पर्धा सुरू राहणार आहे. यासाठी कोणताही निधी पाणी फाऊंडेशनच्या वतीने दिला जात नाही. फक्त गावातील पाच जणांना प्रशिक्षण, प्रत्यक्षात गाव, तालुका यासाठी मार्गदर्शकाची नियुक्ती केली असल्याचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. यावेळी डॉ. सत्यजित भटकळ, सुखदेव भोसले यांची उपस्थिती होती.
आमीरच्या हाकेला भरघोस प्रतिसाद देत गावकरी जमा झाले. त्यांच्यासमोर आमीरने वॉटर कप स्पर्धेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. यावेळी मोठ्या संख्येने तरुणवर्ग उपस्थित होता.
रस्त्यावर पोलिसच पोलिस…
वरिष्ठांनी व्हीआयपी येणार असल्यासची सूचना मिळाल्यानंतर तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर पोलिसांनी बंदोबस्त लावला. पण नेमके कोण येणार? कधी येणार याची काहीच माहिती नसल्याने सर्वजण प्रतीक्षा करीत होते. गावामध्ये पहिल्यांदाच आमीर खान येणार असल्याचे गावातील सगळीकडे पोलिसच दिसत होते.
पुढील स्लाइडवर वाचा, नशीबवाले तो हम हैं…
आमीरनेही स्वत: श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला.
नशीबवाले तो हम हैं…
आपल्याला एकत्र येऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचे आहे, पाणीदार करायचे आहे. हे काम भावी पिढीसाठी करायचे आहे. हे एक पुण्याचे काम असून, आम्ही येथे आल्याने तुम्ही नशीबवान नसून, तुम्ही एकत्र येऊन काम करीत आहात, आम्ही सांगितलेल्या सूचनांनुसार. यामुळे नशीबवाले तर आम्ही असल्याचे उद्गार यांनी काढले.
बहुतांश सर्वच गावकऱ्यांनी प्रत्यक्षात सिनेमा टीव्हीवर पाहिलेला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान यांनी गावात येऊन श्रमदान करणे, प्रत्येक गावकऱ्यांसाठी अभिमानाचे होते. मात्र या अभिनेत्याच्या स्वागताला ना पुष्पगुच्छ होते की बसण्यासाठी खुर्ची. गावकऱ्यांनी स्वागत केले, तोंडी फुले, फुले म्हणत आणि हाताने टाळ्यांचा कडकडाटात तेही कार्यक्रमाच्या शेवटी. या पद्धतीच्या स्वागताने आमीर खान किरण राव यांनी भारावून जात गाव पाणीदार करण्याच्या शुभेच्छा देत निरोप घेतला.
