उद्यापासून पंढरीत एक दिवसाआड पाणीपुरवठा..!
पाण्याचा वापर काटकसरीनं करावा..
मुख्याधिकारी बापट यांचं नागरिकांना आवाहन..!
पंढरपूर Live- दि.१९ एप्रिल
पंढरपूर शहराला उद्या दि.२०-०४-२०१७ पासुन एक दिवसा आड पाणीपुरवठा केला जाणार आहे. पंढरपूर शहराला पाणीपुरवठा होतो त्या बंधा-यात पाणीसाठा अल्प राहिल्याने पंढरपूर शहरात नगरपरिषदेकडून दररोज होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा उद्यापासून एकदिवसाआड होणार आहे.
नागरिकांनी या पाण्याचा वापर गाड्या धुणे, बागकाम, बांधकाम आदींसाठी करणे टाळुन पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केलं आहे.
