ऑटोरिक्षा टॅक्सी संघटना तसेच ग्राहक प्रतिनिधींनासमितीकडे मत मांडण्यासाठी संणकीय सर्व्हे
मुंबई, दि. 18 : महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा टॅक्सी भाडे सुत्र ठरविण्यासाठी ऑटोरिक्षा, टॅक्सी व्यवसायीक,संघटना, तसेच जनतेला आपली मते शासननियुक्त समितीकडे मांडता यावीत यासाठी संगणकीय सर्व्हे घेण्यात येणार आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडे ठरविण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीने ऑटोरिक्षा ,टॅक्सी संघटनांची मते व ग्राहक प्रतिनिधी यांची मते घेतली आहेत पण यात विविध मुदयांवर भिन्नता असल्याने समितीने व्यापक प्रमाणावर ऑटोरिक्षा, टॅक्सी व्यवसायीकांना तसेच जनतेला संगणकीय सर्व्हेच्या माध्यमातून आपली मते समितीकडे मांडण्याचे आवाहन केले आहे.
याबाबतचे ऑटोरिक्षा, टॅक्सी सर्व्हे नमुने विभागाच्या www.transport.maharashtra.gov. in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत.
ऑटोरिक्षा, टॅक्सी भाडेदर सुत्र समितीने महाराष्ट्रातील जनतेचा अभिप्राय,ऑटोरिक्षा चालक अभिप्राय,टॅक्सी चालक अभिप्राय, ऑटोरिक्षा, टॅक्सी संघटनांचा अभिप्राय हे नमुने सर्वेक्षणासाठी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध करण्यात आले असून सर्व्हे नमुने दिनांक 30 एप्रिल 2017 पर्यंत भरणा करून देण्यात यावेत, असेही आवाहन प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

