पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाचा घाला…. सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू…

पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाचा घाला….
सांगलीत भीषण अपघात, देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांचा जागीच मृत्यू…

21 Apr. 2017

सांगली : पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला. मिरज-पंढरपूर मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

सांगलीतील कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव फाट्याजवळ पहाटे चार वाजता भीषण दुर्घटना घडली. पंढरपूरहून विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत.
पंढरपूरहून परतत असताना मिरज-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या मिनी ट्रॅव्हल्सने रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला धडक दिल्याने दुर्घटना घडली. मात्र, अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *