राज्यशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

राज्यशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्क्यांची वाढ
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय

मुंबई दि. 22 : राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दि. 1 जुलै 2016 पासून सात टक्के वाढ करण्याचा निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला असून वित्त विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय दि. 21 एप्रिल 2017 रोजी निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे महागाई भत्त्त्याचा दर 125 टक्क्यांवरून 132 टक्के इतका झाला आहे.
यासबंधीचा शासननिर्णय वित्त विभागाने दि. 21 एप्रिल 2016 रोजी निर्गमित केला आहे. मंजूर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्याचा निर्णयही  या शासननिर्णयान्वये घेण्यात आला आहे.
महागाई भत्ता वाढीचे हे आदेश सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असणाऱ्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.
हा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०४२११७०१४३५५०५ असा आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *