बळीराजासाठी संघर्ष यात्रा..! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पंढरीत माहिती!

बळीराजासाठी संघर्ष यात्रा..! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पंढरीत माहिती!

पंढरपूर- दि. 22 एप्रिल 2017
संघर्ष यात्रा ही केवळ बळीराजासाठी असून साम, दाम, दंडभेदाचा वापर सरकारकडून होत असल्यामूळे त्यांना निवडणूकांमध्ये विजय मिळत आहे. याला मालेगाव, भिवंंडी व पनवेल येथील नगरपालिकांमध्ये रोखले जाईल असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पंढरीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एका खाजगी कार्यक्रमानिमित्त प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आपल्या कुटूंबासह शनिवारी पंढरीत आले होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी शहराध्यक्ष दिपक वाडदेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधिर भोसले, युवक शहराध्यक्ष संदिप मांडवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष शंकर सुरवसे, समाधान सुरवसे आदी उपस्थित होते.

यावेळी पूढे बोलताना तटकरे म्हणाले की, पूढील काळात होणार्‍या तीन महानगरपालिका निवडणूकामध्ये भाजपला रोखण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहे. यासाठी काँग्रेसने वेळीच आघाडी करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांचे नागपूर दिवसेंदिवस त्याठिकाणी घडणार्‍या घटनांमूळे बदनाम होत आहे. आमदार निवासात झालेला प्रकार धक्कादायक आहे. कोणालाही निवास देेणे हे गंभीर असून याची चौकशी व्हायला पाहिजे. राज्यातील मंत्र्यांनी लाल दिवा सोडणेे म्ळणजे लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे सांगत नोटबंदी व केंद्रासह राज्याच्या चुकीच्या धोरणामूळे जिल्हा बँका डबघाईला आल्याचे सांगितले. राज्याच्या अनेक योजना फसव्या असून सरकारला जमिन व मातीची गरज राहिलेली नाही. पक्षांतर विरोधी कारवाई करणार्‍यांना यापूढे सहा वर्ष निलंबित केले जाणार आहे. असे त्यांनी सांगितले. परंतू यावेळी पत्रकारांनी विजयसिंह मोहिते – पाटील व कुटूंबियांबद्दल प्रश्‍न विचारले असता प्रदेशाध्यक्षांनी फारसे ठामपणे त्या प्रश्‍नांना उत्तरे दिली नाही.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थोडीफार अस्थिरता निर्माण झालेली आहे हे मान्य करत याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणूकीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. याबाबतची पून्हा दुसरी बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असून पक्षाचे नेते खा.विजयसिंह मोहिते-पाटील नेहमीच भेटतात असेही ते म्हणाले..!

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *