मिरवणुक काढणा-या प्रत्येक मंडळाचा सन्मान
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचा उपक्रम
पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध मंडळाच्या पदाधिकाºयांचा सत्कार करताना डि राज सर्वगोड.
पंढरपूर : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने पाणी व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डि राज सर्वगोड यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुक काढणाºया प्रत्येक मंडळांच्या अध्यक्षाला सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. तसेच नगरपालिका, पोलीस प्रशासन व समाजातील जेष्ठ लोकांचेही यावेळी गौरव करण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डि राज सर्वगोड, सचिव अनिल ननवरे, सहसचिव प्रविण माने, दिलीप देवकुळे, प्रा. सुदाम गायकवाड, विलास जगधने, डॉ. आनंद गायकवाड, जयंती समिती अध्यक्ष आदम बागवान, सचिव विशाल आर्वे, कार्याध्यक्ष सुरेश नवले, मोहन शिंदे, आनंद सोमासे, दि. बा. शेळके, अॅड. अखिलेश वेळापुरे, पत्रकार सचिन कांबळे, सजंय घोडके, संदिप मुटकुळे, वदंना कसबे, बंटी शिंदे, लखन माने, गजानन शिंदे, रमेश सासवडकर, सोहन जैसवाल, राजश्री सर्वगोड, रेहना अत्तार, मिराताई सरवदे, सुमन जाधव, जयश्री साबळे, रेश्मा सर्वगोड, सुनिता सासवडकर, अंबादास वाघमारे, प्रा. रविराज कांबळे, शिलरतन झेंडे, श्रीकांत कसबे, सुरज पावले, अनिकेत देशपांडे, विकास वाघमारे, आनंद कुंभारे, दिपक नाईकनवरे, सुहास जाधव, प्रशांत आठवले, तुकाराम ढगे, आकाश फडतरे, रणजीत रणदिवे, सोमनाथ झांबरे, बंडु केंगार, सचिन जाधव उपस्थित होते.

