घशात लसूण अडकल्याने मुलाचा मृत्यू
28 Apr. 2017
पिंपरी, (प्रतिनिधी) – पाच वर्षांच्या मुलाच्या घशामध्ये लसूण अडकल्याने श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला.
भोसरीतील राजु लांडगे चाळ येथे गुरुवारी (दि. 27) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नितीन प्रदीप मंडल (रा. गव्हाणे वस्ती, भोसरी, पुणे) असे मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.
मंडल लांडगे चाळीत राहतात. गुरुवारी रात्री त्यांच्या पाच वर्षीय चिमुरड्याने लसून तोंडात घातला. तो घशात अडकल्याने त्याचा श्वास गुदमरला. त्यामुळे तातडीने नितीनला नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याला पुढील उपचारासाठी महापालिकेच्या “वायसीएम’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
