पंढरपूर Live दि.29 एप्रिल 2017
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातल्या सर्व सामान्य वर्गाला अर्थिक, राजकीय, सामाजीक ताकत दिली. एक माणूस या जगामध्ये काय करु शकतो. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाला दाखवून दिले असे प्रतिपादन आ. प्रशांतराव परिचारक यांनी केले. भिमरत्न कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आ. प्रशांत परिचारक बोलत होते.
पुढे परिचारक म्हणाले, डॉ. आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगामध्ये बदल व क्रांती घडलेली आहे. फक्त एका समाजाच नाहीतर, सबंध देशाच भल करु चिंतणारा, एक तत्ववेता, अर्थिक शास्त्रंज्ञ, कृषी तज्ञ, राजकीय नेता अशा अनेक अंगाणी डॉ. आंबेडकर यांनी कायदे तज्ञ असे योगदान दिल. घटना लिहली ऐवढच आपल्याला माहित आहे. परंतु घटनेपेक्षाही बाबासाहेबांच इतर क्षेत्रामधील ही योगदान खुप मोठ आहे. अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच जगामध्ये नाव घेतल जात असे आ. प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उप नगराध्यक्षा सुजाता बडवे, मंडळाचे सस्थापक बाळासाहेब कसबे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, गणेश धांडोरे, पाणी पुरवठा सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक अनिल अंभगराव, गुरुनाथ अंभ्यकर, नारायण शिंगण, नगरसेविका रेहना बोहरी, रेणुका घोडके, माजी नगरसेवक सचिन डांगे, पांडुरंग घंटी, जितेंद्र बनसोडे, विकास वाघमारे, सचिन कांबळे, हरिष ताटे, इब्राहीम बोहरी, महादेव धोत्रे, डॉ. पारस राका, मंडळाचे अध्यक्ष संदिप कसबे, अमित कसबे, रामचंद्र आठवले, सुधाकर बंदपट्टे, डॉ. विश्वास मोरे, गावडे गुरुजी, शंकर कसबे, सागर कसबे, शाकरी हुसेन बोहरी, डॉ. धायतडक, शैलेश धोत्रे, सुनिल झेंडे, रमेश आठवले, निलेश कांबळे, विवेक परदेशी उपस्थित होते.

