शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने -राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति दिन साजरा

पंढरपूर । प्रतिनिधी,
पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथे शौर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दिनांक ६ मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृति दिन
संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी सुखदेव डुबल उपस्थित होते. तसेच शौर्य संस्थेचे संस्थापक – हणमंत बंगाळे, मोहोनी वाघमारे (आरोग्य सेविका, अजनसोंड), पंडित बंगाळे, प्रीतम वाघमारे, रुक्मिणी बंगाळे, व इतरपदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्याच्या नंतर शौर्य संस्थेच्या सचिव- शीतल बंगाळे यांनी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनाविषयी माहिती दिली, शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्व कशाप्रकारे पटवून दिले याचे एक उदहारण
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्या शिवाय त्यांचे दरिद्र, अज्ञान व अंधशद्धा नष्ट होणार नाही, हे जाणून महाराज्यांनी प्राथमिक शिक्षणावर
भर दिला. त्यानुसार त्यांनी १९१७ साली आपल्या संस्थानांत सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणांचा कायदा केला आणि तो अमलात आणला, प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरु केले.
१९१९ साली शाहू महाराजाना सामाजिक कार्याचा गैरव म्हणून कानपुर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना राजर्षी हि पदवी बहाल केली, आशा प्रकारे शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *