![]()
सोलापूर दि.6 :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सोलापूर दि.6 :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बीज भांडवल कर्ज योजना
राबविण्यात येत आहे. ही योजना फक्त अराखीव उमेदवारासाठी उपलब्ध असून या योजनेतून 5 लाख रूपये पर्यंत
कर्ज मिळते. यामध्ये महामंडळाचे 35 टक्के ( दरसाल दरशेकडा 4 टक्के व्याज दराने ) बॅकेकडील 60 टक्के व
अर्जदाराचा 5 टक्के सहभाग राहणार आहे. कर्जफेडीचे कालावधी 5 वर्षे राहणार आहे. या योजनेच्या लाभासाठी
उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्षे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. 6,00,000/- असणे आवश्यक आहे. कर्जासाठीचे अर्ज व
कर्जाबाबत लागणारी कागदपत्रे व इतर माहिती mahswayamrojgar या वेबसाईटवर उपलब्ध असून जास्तीत
जास्त उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांनी कळविले आहे.



