रोपळे येथे शेतकरी मेळावा संपन्न…. शेतकर्‍यांनी शाश्‍वत शेती केली पाहीजे-कसपटे

पंढरपूर(प्रतिनिधी) : सध्या शेतकर्‍यांवर अनेक संकटे कोसळत असून शेतकर्‍यांनी आहे त्या साधनांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून शाश्‍वत शेती करणे गरजेची आहे. अनं शास्वत शेती सिताङ्ग ळाच्या पीकाच्या माध्यमातून साध्य होवू शकते असे प्रतिपादन अखिल भारतीय सिताङ्ग ळ संघटनेचे अध्यक्ष नवनाथ कसपटे यांनी केले.

पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे यश पब्लिक स्कूल येथे आयोजीत करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी सिताङ्ग ळ संघटनेचे सचिव राजेंद्र देशमुख, कृषी अधिकारी सयाजी गायकवाड, विनोद महाडीक, संतोष सुर्वे, संचालक दिनकर कदम, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, नागनाथ माळी, नारायण गायकवाड यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये माजी कृषी अधिकारी मधूकर गुंजाळ यांनी शेतकर्‍यांनी पीक पध्दतीमध्ये बदल करून आपल्या शेतीची प्रगती केली पाहीजे. ऊसाशिवाय इतर पिकांकडेही शेतकर्‍यांनी कल दाखविला पाहीजे असे सांगुन परिसरातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करण्याचे अवाहनही त्यांनी यावेळी केले. तर पीआय दशरथ पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रयोजन व्यक्त केले.
पुढे बोलताना कसपटे यांनी सिताङ्ग ळ पिकाची लागवड, खत व्यवस्थापन, बहार धरणे, मार्केटींगसाठी असणारा वाव व त्यापासुन मिळणार अर्थिक उत्पन्न याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संघटनेचे सचिव राजेंद्र देशमुख यांनी सिताङ्ग ळ पीकाबाबत आपले अनुभव सांगितले तर कृषी अधिकारी सयाजी गायकवाड यांनी ऊस, मका, कांदा, तूर या पिकांबाबत माहिती सांगितली. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले. तर अभार संचालक दिनकर कदम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञान, कला, क्रिडा व कृषी संस्थेच्या यश पब्लिक स्कूलचे उपाध्यक्ष संजय पाटील व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *