8 May. 2017
नवी दिल्ली – भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करणाऱ्या पाकिस्तानला भारताने धडा शिकवला आहे. कसा धडा शिकवला हे दाखवणारा एक व्हिडिओच आता भारतीय लष्कराने जारी केला आहे. 1 मे रोजी कृष्णा घाटीमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या लष्करी चौक्या उद्धवस्त केल्या होत्या. या हल्ल्यासाठी अँटी टॅंक गायडेड मिसाईलचा वापर करण्यात आला होता. या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या 7 सैनिकांना कंठस्नान घातले होतं.
मात्र, अशी कोणतीही कारवाई झाली नाही, असा कांगावा पाकिस्तान करत होतं. आज अखेर भारतानं या कारवाईचा व्हिडिओच जारी केल्यानं पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे.



