सांगोला/ उदनवाडी. ( प्रतिनिधी ) – शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवताना मरण आले तर आनंद आहे असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगोला तालुक्यातील उदनवाडी गावात केले. संवाद यात्रा निमित्त खोत यांनी उदनवाडी येथे भेट दिली.
खोत म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिलेली साथ त्याची मला जाणीव आहे. उदनवाडी गावाने मला पडत्या काळात पहाडा सारखी साथ दिली. आज जरी मंत्री झालो तरी तुमच्या मुळे तथा तुमच्या आशीर्वादामुळे मंत्री झालो. तुम्ही दिलेले प्रश्न सार्थी लावायचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किमान 15 दिवस विश्रांतीची गरज आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढता लढता जर मरण आले तर ते माझे भाग्य आहे. बंधारे विविध विकास कामे रस्ते इत्यादी विविध कामाच्या मागणीचे निवेदन सरपंच यांनी दिली. शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊन नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप व्हावे, कॅनलव्दारे टेंभू योजनेचे पाणी पुरवठा करणे व्हावे, बेलवण नदी मध्ये पाणी सोडण्यात यावे, बुद्धेहाळ तलावामधून पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी विहीर, मोटर, पाईप लाइन व्हावी, शेतकऱ्यांना पूर्वी प्रमाणे फळ लागवाढ अनुदान व ठिंबक सिंचन त्वरित मिळावे, बेलवन नदी मधील चिलार काढणे व खोलीकरण करण्यात यावे. सर्व शेतकऱ्यांना पीक जळीत अनुदान मिळावे, सर्व 7/12 गटांच्या सीमा शासकीय यंत्रणेमार्फत निश्चित करण्यात यावे, बी-बियाणे व खते शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप व्हावे, अशा मागण्या उदनवाडी ग्रामस्थांच्या माध्यमांतून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या कडे निवेदन मार्फत करण्यात आले. यावर खोत म्हणाले की, तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच पत्रकार शाहरुख मुलाणी यांनी ज्याप्रमाणे करता माणूस कुठुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतो, त्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत असे सांगितले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, माजी सरपंच फारूक मुलाणी, सरपंच आण्णासाहेब बंडगर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




