जळगाव: शहरातील ४५ दारू दुकानांवर गदा अाल्यानंतर ते स्थलांतराच्या कामाला गती अाली अाहे. परंतु नागरिकांकडून त्यालाही विराेध सुरू झाला अाहे. वाॅर्ड क्रमांक ३६ च्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना हात जाेडताे, अामच्या वाॅर्डात दारू दुकानांना परवानगी देऊ नका, असे भावनिक अावाहन केले अाहे. तर संपूर्ण शहरात दारूबंदी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्याचे अावाहन प्रा.शेखर साेनाळकर यांनी केले अाहे.
शहरातील नागरी वस्तीत अाता दारूची दुकाने परमिट रूम स्थलांतरीत करण्याच्या हालचालींना गती अाली अाहे. शहरातील वाॅर्ड क्रमांक ३६ मधील नगरसेविका अश्विनी देशमुख यांच्यासह नागरिकांनी याच संदर्भात जिल्हाधिकारी किशाेर राजेनिंबाळकर यांना निवेदन दिले. वाॅर्डात नोकरदार, सुशिक्षित नागरिक, तरुणांचे प्रमाण खूप माेठ्या प्रमाणात अाहे. वाॅर्डात महिला, तरुण, तरुणींसाठी टीव्ही, व्हाॅट्सअॅप, माेबाइलपासून दूर ठेवण्यासाठी रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत ब्लॅक अाऊट, वाचन कट्टा, लहान मुलांसाठी संस्कार वर्ग, अायुर्वेदिक अाराेग्य शिबिर, असे उपक्रम राबवले जातात. या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. या भागात दारू दुकाने अाली तर सुशिक्षित सुसंस्कृत तरुणपिढी घडवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसेल. यामुळे महिलांची छेडछाड वादाचे प्रसंग वाढतील. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मुक्तपणे वाॅर्डात फिरण्यावर गदा येईल. हा प्रकार महिलांच्या स्वातंत्र्यावर घाला ठरेल. त्यामुळे वाॅर्ड क्रमांक ३६ मध्ये दारू दुकान बार रेस्टाॅरंटला परवानगी देऊ नये, अशी मागणी नगरसेविका देशमुख यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली अाहे.
शहरात दारूबंदीसाठी तयार व्हा
शेखर साेनाळकर प्रणाली सिसाेदिया यांनी संपूर्ण शहर दारूबंदीसाठी प्रयत्नांची गरज व्यक्त केली अाहे. मनपातील भाजपच्या नगरसेवकांनी यापूर्वीच दारूबंदीची मागणी केली अाहे. अामदार सुरेश भाेळेंनीही असाच मनाेदय व्यक्त केला अाहे. त्यामुळे अागामी काळात जळगाव जिल्ह्यात दारूबंदीसाठी कटिबद्ध व्हावे, महिला संघटना, महिला मंडळे, राजकीय पक्षांच्या महिला संघटनांनी अांदाेलनात नेतृत्व करावे, असे अावाहन केले अाहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



