सोलापूर येथील कुंभारी रोडवरील विजयनगर येथील पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या इराबत्ती टेक्सटाइलल रात्री आग लागली.
या आगीत लाखाे रुपयांचे नुकासन झाले आहे.
या आगीत कारखान्याच्या तळमजल्यावरील सर्व कच्चा आणि तयार माल, मशीन जळून खाक झाले आहे. यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५० पाण्याच्या गाड्यांचा वापर झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. यामुळे अग्निशामक दलाच्या जादा गाड्या बोलवत पाण्याचा सर्व बाजूंनी फवारा करण्यात आला. या आगीत पीफओ मशीन, टेरी टॉवेल, कच्चा व पक्का माल आदी माल जळून खाक झाला आहे.



