सुब्रमण्यम स्वामी यांचा दावा
नवी दिल्ली – देशात हिंदुंची संख्या 80 टक्के इतकी आहे पण हा हिंदु समाज विविध जातीपातीत विभागला गेला होता. त्यांच्यात दक्षिण-उत्तर, पुर्व-पश्चिम, ब्राम्हण-क्षत्रिय अशीही विभागणी होती. पण त्याच वेळी अल्पसंख्य मात्र एकजूट होते पण आता नेमकी उलटी स्थिती असून सर्व भेदभाव विसरून हिंदु समाज एकत्र आल्यानेच भारतीय जनता पक्षाला विजय मिळवणे सुकर होत गेले आहे असे प्रमुख कारण या विजयामागे आहे असे प्रतिपादन जनता पार्टीचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे. भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि त्यांची कडक प्रशासकाची भूमिका तसेच पक्षाची भ्रष्टाचाराच्या विरोधातील मोहींम याहीं बाबी भाजपच्या विजयासाठी अनुकुल ठरत आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. ते आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
कॉंग्रेसची वाताहत का होत आहे याचे विश्लेषण करताना स्वामी म्हणाले की गेल्या 30-40 वर्षांपासून भारतात काही मुलगामी बदल होत आहेत. तरूण पिढीही प्रखर राष्ट्रवादी बनत चालली आहे. त्याचा फटका कॉंग्रेसला बसत आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व कसल्याच अर्थाने सक्षम नाही. त्यांच्याकडे कोणतीही नवीन संकल्पना दिसत नाही. शिवाय हिंदुत्व ही एक अशी संकल्पना आहे ज्याचे अधिकृत शिक्षण कोणत्याही शाळा महाविद्यालयात दिले जात नाही. ही वस्तुस्थिती जाणून घेणारा कॉंग्रेस मध्ये कोणीही नाही. याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. कॉंग्रेस ही विदेशी पार्टी आहे आणि त्याचे नेतृत्व विदेशी लोकांच्या ताब्यात आहे हे पक्षाच्या पराभवाचे आणखी एक प्रमुख कारण आहे असे ते म्हणाले. नेतृत्व बहरावे लागते. ते आपसुक होत नाही. भाजपमध्येही वाजपेयींनंतर कोण असा सवाल केला जात होता. पंधरा वर्षांपुर्वी मोदी कोण होते?. पण पक्षाने त्यांच्यात गुंतवणूक केली आणि ते बहरले असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्येही हिंदुत्वाच्या भावनेचा प्रसार वेगाने होऊ शकेल असा दावाही त्यांनी केला.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





