👁 8 Views

व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर अश्‍लील फोटो, दोघांवर गुन्हा दाखल

लातूर – सध्या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर अश्‍लील फोटो तसेच चित्रफिती व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘युवासेना’ या नावाने चालणाऱ्या व्हॉट्‌स ऍप ग्रुपवर अश्‍लील चित्रफित शेअर करण्यात आली होती. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी या ग्रुपचा प्रमुख गोकुळ चांडकसह चित्रफीत शेअर करणारा ग्रुप सदस्य विष्णू घुटे यांना अटक करण्यात आली आहे. मुरुड पोलिसांनी ही कारवाई केली असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ग्रुपमधील महिला सदस्यांच्या तक्रारीवरून या दोघांवर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनेक सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये शेअरींग करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *