👁 9 Views

संभाजीराजांचा आदर्श घेऊन आजच्या मावळ्यांनी वाटचाल करावी -शिवाजी शिंदे

फुलचिंचोंली येथे 101 जणांनी केले रक्तदान

। फुलचिंचोली, प्रतिनिधी

छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत लहान वयातच अनेक गड, किल्ले जिंकले. ते एकही लढाई हरले नाहीत. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण होण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्याचबरोबर शिवराय व संभाजीराजांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त वाहिले, त्यांचा आदर्श घेऊनच आजच्या तरुण पिढीने आपली वाटचाल करावी, असे प्रतिपादन पत्रकार शिवाजी शिंदे यांनी केले.
फुलचिंचोली (ता. पंढरपूर) येथे छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचे औचित्य साधून छावा गु्रपच्यावतीने आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना शिवाजी शिंदे म्हणाले, रक्तदान ही काळाची गरज बनली आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यासाठी रक्तदानाच्या चळवळीबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीचे औचित्य साधून छावा ग्रुपने आयोजित केलेला रक्तदान शिबीराचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी रमाकंत पाटील, माजी सरपंच मारूती वाघ, चेअरमन उमाकांत पाटील, चळे तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्ता मोरे-पाटील, डॉ. लक्ष्मण किलमिसे, डॉ. भारत म्हेत्रे, छावा ग्रुपचे अध्यक्ष नाना नागरे, सुदाम काळे, भारत ढाळे, पत्रकार सावता जाधव, नाना धाडोंरे, किरण काळे, विलास पाटील, दत्ता ढाळे, मौलाली मणेरी, नाना कोळी, समाधान गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
रविवारी दि. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना गावातील माजी सैनिक व माजी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आली. रक्तदान शिबिराप्रसंगी गावातील 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल शिंदे, तर सूत्रसंचालन सिध्देश्‍वर तोरकडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी छावा गु्रपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *