👁 11 Views

डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यामातून भारतीय संस्कृती जगापुढे येईल

पुणे, दि. १३ मे : ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ मधून अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट विद्यार्थी निर्माण होतील. ते विश्‍वशांती स्थापन करण्यास महत्वपूर्ण भूमिका निभावतील. अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले,विश्‍वामध्ये ब्रिटिश मॉडेल, युरोपियन मॉडेल आहे, त्याच प्रमाणे आता एक उत्तम भारतीय मॉडेल ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ च्या माध्यामातून जगासमोर मांडण्यात येत आहे. भारताच्या शिक्षण क्षेत्रात नवीन दालन उघडले आहे. शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याचे आणि विश्‍वशांतीसाठी महत्वपूर्ण कार्य येथून केले जाणार आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविण्यावर बारकाईने लक्ष दिले जाईल.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले की, ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळाल्यानंतर जे स्वातंत्र मिळाले त्याचा उपयोग करून शिक्षण क्षेत्रात आम्ही आमूलाग्र परिवर्तन करू. जेणे करून विद्यार्थांचे आयुष्याला चारित्र्यसंपन्न अशी नवी दिशा दिली जाईल. भगवान गौतम बुद्ध आणि स्टीव जॉब यांचा समन्वय करून ज्या पद्धतीचा फोटो निर्माण केला आहे, त्याच प्रकारची नवी पिढी निर्माण करण्यास ही युनिव्हर्सिटी कटिबद्ध असणार आहे.
नालंदा विश्‍व विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ.विजय भटकर म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयावर आधारित असे ज्ञान येथे मिळेल. ही युनिव्हर्सिटी जगात आपले वेगळेपण निर्माण करील. येथील विद्यार्थी विश्‍वशांती निर्माण करण्यासाठी राजदूताची भूमिका निभावतील.
एमआयटी एडीटी विद्यापीठाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड म्हणाले, पुर्वेकडील एमआयटीने पश्‍चिमेकडील एमआयटीपेक्षा शिक्षण क्षेत्रात नवीन पाउल उचलले आहे. जगातील मानवाला शांती मिळण्यासाठी येथून कार्य केले जाईल. पुढील काळात ज्यांना विद्यापीठ स्थापन करावयाचे आहे, त्यांना ‘पीस’ शब्दाचा वापर करण्यापूर्वी खूप विचार करावा लागेल.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल म्हणाले, येथे उच्च दर्जाचा मनुष्य घडविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात केले जाईल. वंचितांना शिक्षण देण्यासाठी डॉ.विश्‍वनाथ कराड यांची सुरूवाती पासूनची भूमिका होती. ती आज युनिव्हर्सिटीच्या माध्यातूनही ते पूर्ण करतील.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. गोविंद स्वरूप म्हणाले, हे विद्यापीठ जगाला शांतीचा संदेश देणारे असेल.
हे विद्यापीठ जागतिक पातळीवर कार्य करील. शिक्षणाच्या दृष्टीने पुणे शहराला स्वतंत्र चेहरा, शिक्षण, संस्कृती आहे. येथे मणुष्य घडविण्याचे कार्य होत आले आहे. डॉ.विश्‍वनाथ दा.कराड यांची तपश्‍चर्या फळाला येऊन त्याचे परिवर्तन विद्यापीठात झाले आहे. येथून विश्‍वाला शांती देण्याचे कार्य होईल. डॉ.कराडांच्या अनुभवाने हे विद्यापीठ सर्वोत्कृष्ठ मानव चरित्र निर्माण करण्यास मदद करील. असे विचार प्रा.एस.एस. दराडे-पाटील, प्रा. प्रकाश जोशी, प्रा. हरी नरके, डॉ.एडिसन सामराज, पं.वंसतराव गाडगीळ, डॉ. एस.एन.पठाण, डॉ. रतनलाल सोनग्रा आणि डॉ.बंडर्स यांनी व्यक्त केेले.
—————————————————–

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *