👁 10 Views

डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शुभारंभ (तंत्रज्ञान, संशोधन, सामाजिक नवनिर्मिती आणि भागीदारी)

पुणे, दि. १३ मे : उच्च शिक्षणाचा दर्जेदार विकास करण्याकरिता माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे या संस्थेला ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ या नावाने विद्यापीठ सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हे विद्यापीठ स्वयं अर्थसहायित असणार आहे.
औद्योगिक निपुणता, तंत्रज्ञान आणि वैश्‍विक मूल्ये यांचा संगम घडविणारा अभ्यासक्रम राबविणारे सर्व जगाच्या शैक्षणिक इतिहासामधील पहिले ‘डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ’ २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शुभारंभ होत आहे.
या विद्यापीठामध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन तसेच राजकीय नेतृत्वाचे प्रशिक्षण देणारा देशातील पहिला अभ्यासक्रम (एमपीजी) असे शिक्षणक्रम सुरू केले जात आहेत. तसेच, अभियांत्रिकी, व्यवस्थापन व सोशल सायन्स या विषयात पीएचडीसाठी मार्गदर्शन देखील केले जाईल.
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा प्रमुख उद्देश हा शिक्षण आणि वैश्‍विक मूल्ये यांची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हा असून, गेल्या सुमारे चार दशकांपासून माईर्स एमआयटी शिक्षणसमूहांतर्गत राबविल्या जाणार्‍या शिक्षणपद्धतीचा अवलंब येथे केला जाणार आहे. माईर्स एमआयटीचे एक लाखाहून अधिक पदवीधर आजा जगभर विखुरले आहेत.

येथे रिसर्च कोलॅबोरेशन (संशोधन सहकार्य), इंडस्ट्रियल कोलॅबोरेशन फॉर इंटर्नशिप (उमेदवारीसाठी औद्योगिक क्षेत्राशी सहकार्य), अ‍ॅकॅडमिक क्रेडिट सिस्टीम(एसीएस) ( शैक्षणिक गुणांकनाची आधुनिक पद्धत), हाय स्टॅन्डर्ड फॅकल्टी (उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग), इंटरनॅशनल ट्रान्सफर प्रोग्राम(आयटीपी) (आंतरराष्ट्रीय देवाण-घेवाण), पीस फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट (सार्वत्रिक विकासासाठी जागतिक शांतता),स्पोर्टस कल्चर फॉर पीस (विश्‍वशांतीसाठी क्रीडा वृत्तीची संस्कृती), सोशल मिशन्स (सामाजिक प्रकल्प), अ‍ॅल्युम्नी इन्व्हॉल्व्हमेंट (माजी विद्यार्थांची संस्थेत गुंतवणूक), लाईफ अ‍ॅट एमआयटी-बिऑन्ड क्लासरूम (वर्गाबाहेरील जीवन पद्धती), करिअर सर्व्हिसेस (रोजगारासाठी मार्गदर्शन),स्कॉलरशिप फॉर मेरिटोरियस स्टूडंट्स (गुणवान विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती), फॉस्टरिंग आंत्रप्रेन्युरशिप (उद्योजकता विकास), डिजिटल लर्निंग टेक्नॉलॉजी (डिजिटल तंत्रज्ञान)आणि रेसिडेन्शियल प्रोग्रम्स (निवासी अभ्यासक्रम) राबविले जाणार आहेत.
येत्या शैक्षणिक वर्षापासून (२०१७-१८) अभियांत्रिकी शाखेतील मेकॅनिकल, इलेक्ट्र्रिकल आणि सिव्हिल इंजिनियरींगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, एका वर्षासाठी इंडस्ट्रियल टे्रनिंग सुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. व्यवस्थापन शाखेतील बीबीए, बीबीए(आयबी)साठी मार्केटिंग, फॉयनान्स, एचआर हे अभ्यासक्रम असतील. डयूएल स्पेशलायझेशनमध्ये स्पोर्टस, सीएसआर, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टूरिझम, इव्हेन्ट मॅनेजमेंट, आंत्रप्रेन्युरशिप असेल. एमबीएसाठी सीएसआर, स्पोर्टस मॅनेजमेंट, बी.एससी. व एम.एससी. इकॉनॉमिक्स, राजकीय नेतृत्व घडविणारा भारतातील पहिला आगळा-वेगळा अभ्यासक्रम- मास्टर्स प्रोग्राम इन गव्हर्नमेंट (एमपीजी) याचा देखील समावेश आहे. त्याच बरोबर अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि सोशल सायन्सेसमध्ये पीएचडी सुद्धा करता येईल.
उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक सुधारण्याच्या दृष्टीने संशोधक वृत्तीचा विकास करणे, रोजगार देणारे उद्योजक निर्माण करणे, नाविन्यपूर्ण व कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे इत्यादि डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीची वैशिष्टये असतील.
या युनिव्हर्सिटीमध्ये जगातील नामवंत कंपन्या, विद्यापीठे, संशोधन संस्था यांच्या सहकार्याने शैक्षणिक व संशोधनकार्य करून जागतिक दर्जाचे विद्यार्थी निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
स्वायत्ततेचा परिपूर्ण उपयोग करून उद्योगधंद्यांच्या मागणीनुसार व आवश्यकतेनुसार विद्यार्थी घडविणे व कुशल मनुष्यबळ तयार करणे, तसेच विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नोकरीसाठी संधी उपलब्ध करून देणे हेही कार्य येथे केले जाणार आहे. जागतिक संशोधन केंद्र व्हावे, यासाठी नवनिर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या विद्यापीठात क्रीडाक्षेत्राला देखील विशेष प्राधान्य दिले जाईल.
या विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती अवलंबिली जाणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राध्यापक येथे अध्यापन करतील. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत परिवर्तन करून इतर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम देखील या विद्यापीठात राबविले जाणार आहेत. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीचा अवलंब करून सुजाण, सृजनशील व जबाबदार असा मानवतावादी नागरिक घडविणे, हे या विद्यापीठाचे ध्येय असणार आहे. भारतीय संस्कृती, तत्वज्ञान व परंपरेनुसार वैश्‍विक मूल्यांची जाणीव येथील विद्यार्थ्यांमध्ये रुजवून जगातील एकमेव असे विश्‍वशांतीचा संदेश देणारे हे विद्यापीठ असणार आहे.
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी १९८३ मध्ये एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. आज संस्थेच्या महाराष्ट्रात ६३ शिक्षण संस्था असून त्यामध्ये ५४ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *