महेंद्र जाधव
पंढरपूर : रिपाइं युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव यांनी रिपाइंला राम राम करत. जोगेद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लीकन पार्टीत प्रवेश केला आहे.
महेंद्र जाधव रिपाइंमध्ये मागील १५ वर्षापासून काम करत आहेत. या कालावधीत त्यांना शाखा अध्यक्ष ते तालुकाध्यक्ष असे काम केले आहे. रिपाइं युवक आघाडीच्या तालुकाध्यक्ष पद म्हणून चार वर्ष काम केले आहे. युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष पदी असताना जाधव यांनी अनेक आंदोलन व समाज कार्य केले आहे. तसेच रिपाइंच्या वतीने ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची निवडणूक ही लढविली आहे.
मात्र मागील काही कालावधीपासून तालुक्यातील रिपाइंच्या नेत्याकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांच्या रिपाइं ला राम राम करत, जोगेद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लीकन पार्टीत प्रवेश केला आहे.
पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे महाराष्टÑ उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांनी तालुकाध्यक्ष पदी निवड केली आहे. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी दिले आहे. यावेळी नवनाथ जाधव, तुकाराम रणपिसे, विशाल सावंत, विकास गायकवाड, अमित चंदनशिवे, देवा तावरे, बाबासाहेब प्रशाळे, आबा रणपिसे, आकाळ चंदशिवे, संतोष जाधव, बबलु तावरे, प्रकाश मोरे, अमित जाधव, संतोष जाधव, सुधिर जाधव उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




