👁 8 Views

13 वर्षांच्या कुमारी मातेला न्याय मिळणार कधी?

सुरभी शिरपुरकर, 22 मे : बाळाचे वय ४ महिने आणि त्याच्या जन्मदात्री आईचं वय १३ वर्ष. ऐकायला काहीसं आश्र्चर्यकारक वाटत असलं तरी हे खरं आहे. नागपूरजवळील काटोल परिसरात बळजबरीच्या प्रकारातून ही कुमारीमाता गर्भवती राहिली होती. पीडित कुटुंबियांनी आरोपीच्या विरोधात पोलिसात तक्रारही दाखल केलीय. पण या गंभीर प्रकाराची साधी दखलही घ्यायला कोणतीही संघटना तयार नाही.
मातृत्वाचा पुरेसा अर्थही न उमगलेली ही १३ वर्षांची कुमारीमाता. आपल्या आई आणि आजीसोबत काटोलमध्ये राहते. याच परिसरातल्या निखिल नावाच्या नराधमाने तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केला आणि त्यातूनच ती गर्भवती राहिली. पण वेळीच हा सगळा प्रकार लक्षात न आल्याने अॅबॉर्शन करणं मुलीच्या जीवासाठी धोकादायक बनलं. त्याचाच परिपाक म्हणून ही कोवळी पोर कुमारीमाता बनली. या चिमुकलीला तिच्यावर झालेला अन्यायही धडपणे सांगता येत नाहीये.
या कुमारीमातेची आई चार-दोन घरांची धुणीभांडी करून कसंबसं घरं चालवते. अशातच तिच्या मुलीसोबत हा असा बाका प्रसंग ओढवलाय. झाल्या प्रकाराविरोधात या मायलेकींनी पोलिसात रिसतर एफआयआरही दाखल केली होती. पण नराधम आरोपी जामीन घेऊन मोकाट फिरतोय
आता या १३ वर्षाय कुमारीमातेपुढे बाळाच्या संगेापनाचा प्रश्न आ वासून उभा राहिलाय. कुठून तरी न्याय मिळेल या आशेपोटी या मायलेकी दारोदारी फिरताहेत.
महिला अत्याचाराच्या घटना घडल्या की आपल्याकडे अनेक संघटना हिरfरीने पुढे येतात. आंदोलनं करतात. पण या चिमुकलीसाठी अजूनतरी केाणीही पुढे आलेलं नाही. कुणी न्याय देतं का न्याय ? असं म्हणण्याची वेळ या मायलेकींवर येऊन ठेपलीय.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *