एक्यूयोगा (Acuyoga) भाग 7
एक्यूयोगा क्रमशः
२२) डाव्या हाताने डाव्या मांडीवर समोरून खाली अंगट्या शेजारच्या बोटापर्यंत आणि उजव्या हाताने उजव्या मांडीवरून समोरून खाली अंगट्या शेजारच्या बोटापर्यंत मसाज करावा.
यामुळे स्टमक गॉल ब्लॅडर आणि युरिनरी ब्लॅडर हे पायावरील तीन डिसेंडिंग चॅनेल आहेत. त्यामुळे पचनशक्ती सुधारते व पायात शक्ती येते
२३) डाव्या हाताने डाव्या मांडीवर बाहेरून खाली करंगळी शेजारील बोटापर्यंत आणि उजव्या हाताने उजव्या मडीबाहेर खाली करंगळी शेजारील बोटापर्यंत मसाज करावा यामुळे गॉल ब्लॅडरचे कार्य सुधारते.
२४) उभे राहून डाव्या हाताने डाव्या कमरेखालुन गुडघ्याच्या मागून खाली पायाच्या करंगळीकडे तसेच उजव्या हाताने उजव्या कमरेखालुन गुडघ्याच्या मागून खाली पायाच्या करंगळीकडे मसाज करावा. यामुळे मूत्राशयाचे कार्य सुधारते. कंबर दुखी कमी होते.
खाज, पोट दुखणे, सायटिका, सूज यामध्ये फायदा होतो.
डॉ. साखरे एम.एस.
M.D (Acuppuncture)
D.A.C., F.I.A.C,.,N.D.DB.F.R
श्री स्वामी समर्थ एक्यूपंक्चर सेंटर
58, पार्क स्टेडियम, सोलापूर.
मो.९८९०१९५०५९
क्रमशः
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111








