👁 14 Views

राज्यात मध्यावधी निवडणुका शक्य : एकनाथ खडसे


ऑनलाईन टीम / धुळे :


राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात, अशी शक्यता भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. ‘सरकारला तीन वर्ष झाली, सरकारनश लोकोपयोगी कामेही केली. मात्र, केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडले, असेही खडसे यावेळी म्हणाले. ते धुळय़ातील प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आपल्याच पक्षाचे सरकार असताना मध्यावधी निवडणुकांचे भाकित खडसेंनी केल्याने राज्हकीय वर्तुळासा विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्या एकनाथ खडसे भाजपमध्ये एकाकी पडले आहेत. त्यातच त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केल्याने याबाबत बरीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी संघर्ष यात्रेवेळी विरोधकांनी खडसेंच्या फार्म हाऊसवर त्यांची भेट घेतली होती.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *