👁 10 Views

दम असेल तर, मुंबईत येऊनच दाखवा – अरुण दुधवडकर

.सिंधुदुर्ग  – कर्नाटक राज्याचे नगरविकासमंत्री रोशन बेग यांनी महाराष्ट्रात मुंबईत येऊन दाखवावे. मग त्याला “जय महाराष्ट’ म्हणजे काय ते दाखवून देऊ. बेग यांना त्यांची औकात दाखविण्याची वेळ आली आहे. राज्यात कर्नाटकच्या ज्या गाड्या येतील त्या सर्व गाड्यांवर “जय महाराष्ट्र’ लिहिले जाईल. या आंदोलनात शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असून बेग यांनी कर्नाटकातील कोणतेही ठिकाण सांगावे शिवसेना तेथे येऊन “जय महाराष्ट्र’ लिहून दाखवेल असा इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज येथे दिला. ते भरड येथे पत्रकारांशी बोलत होते.
दुधवडकर म्हणाले, बेळगावसह अखंड महाराष्ट्र होण्यासाठी मराठी बांधव गेली अनेक वर्षे त्रास सहन करत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटकच्या मंत्र्यांने जय महाराष्ट्र उल्लेख करण्यास बंदी करत मराठी माणसाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटकातील अनेक गाड्यांवर जय महाराष्ट्र असे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लिहिले आहे. जय महाराष्ट्र म्हणजे काय ते बेग यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे. बेळगावात मराठी बांधवांच्यावतीने सुरू असलेल्या लढ्यात शिवसेना सदैव सहभागी झालेली आहे. आपण काल बेळगावात जाऊन जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आंदोलन तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *